चौफेर न्यूज – बलाढ्य संघांना पराभूत करत आपली दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या अफगाणिस्तानच्या संघाला आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाच्या संघाने ६ गडी आणि ७२ चेंडू राखून पराभूत केले.

ईक्रम अली खिलच्या ८० धावांच्या खेळीच्या जोरावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सर्वबाद १८१ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाने या लक्ष्याचा पाठलाग करताना ३७.३ षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड्सने ७० धावांची खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये जॉनथम मेरलोने १० षटकांमध्ये २४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. मेरलोने २ निर्धाव षटकेही टाकली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुसर्कार देण्यात आला. आता अंतिम फेरीमध्ये तिन वेळा स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा सामना बांग्लादेश विरूद्ध भारत उपांत्य फेरीत विजयी होणाऱ्या संघाशी असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 1 =