चौफेर न्यूज – प्रचिती प्री- प्रायमरी स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असतात. शैक्षणिक वर्षामध्ये प्रचिती स्कूलमध्ये नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याने अक्षरांची ओळख उपक्रमातून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यात आले.

त्याचप्रमाणेच २०१८-१९ च्या शैक्षणिक वर्षात देखील प्रचिती स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या पुर्वज्ञानाचा आढावा घेण्यासाठी एक नाविण्यपुर्ण उपक्रम बुधवार दि. २५ रोजी राबविण्यात आला. या नाविण्यपुर्ण उपक्रमामध्ये मनोरंजनातून शिक्षण या उक्तीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे नंबर ओळख, अक्षर ओळख तसेच विविध अक्षरांची ओळख यासह संख्यांचा क्रम व क्वीझ कॉन्टेस्‍ट आदी उपक्रम शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांच्या मार्गदर्शनाने व व्यवस्थापक वैभव सोनवणे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची फाईन मोटर्सस्कील व ग्रॉस मोटोरस्कील वाढविण्यात आली. या उपक्रमात विविध खेळ घेण्यात आले. त्यामध्ये नर्सरी – ऑबस्ट्रकल रनिंग रेस, पेपर बॉल बॅलन्स, स्टीक गेम. एलकेजी – सिक्वेन्स द नंबर. युकेजी – क्वीझ कन्टेस्ट. अशा प्रकारे हा नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आला. शिक्षीका भारती पवार, पुनम पवार, श्वेता रौंदळ, वृषाली सोनवणे, प्रिती लाडे, प्रतिभा अहिरराव, स्नेहल पाटील शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, दिपक अहिरे, शांताराम पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांच्या सहकार्याने कार्यक्रम घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − twelve =