चौफेर न्यूज –  नवोदित गायकांना व्यासपीठ मिळावे यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पिंपरी चिंचवड आयडॉल ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदाचे या स्पर्धेचे ५ वे वर्ष असून, या स्पर्धेस शहरातील गायकांनी आजपर्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे. या स्पर्धेतील अनेक स्पर्धक संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. यंदाच्या वर्षी देखील नवोदित गायकांना व्यासपीठ मिळण्यासाठी पीसीएमसी आयडॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेशिका भरणे आवश्यक असून प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख  ५ जुलै २०१८ आहे. स्पर्धेचा वयोगट १५ ते ३५ वर्षे असा आहे.

या स्पर्धेचे आयोजन हर्षवर्धन भाऊसाहेब भोईर यांनी केले असून संयोजन कु. मानसी भोईर आणि सुषमा बोऱ्हाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :- ९८२२६०७६८७, ९८२२३१३०६६, ८०५५७७९३४४ या मोबाईल नंबर वर संवाद साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + 10 =