चौफेर न्यूज ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे चंद्रशेखर भुजबळ यांची पिंपरी चिंचवड महानगर शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत ड. चंद्रशेखर भुजबळ यांना नियुक्ती पत्र दिले आहे. ड. भुजबळ हे मागील दहा वर्षांपासून न्यायालयात फौजदारी वकील म्हणून सक्रिय आहेत. समता परिषद, ओबीसी संघर्ष समिती, अखिल भारतीय माळी शिक्षण संस्था, महात्मा फुले वसतीगृह आणि फुले, शाहू, आंबेडकर पुरोगामी विचार मंच या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र पातळीवर ओबीसी वकीलांचे संघटन करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 − 5 =