सोनगीर दि. 24 एप्रिल 17 :  येथील पाणी टंचाई दुर होण्यासाठी अखेर तापीचे पाणी घेण्याचा निर्णय प्रशासन स्तरावर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी घेतल्यानंतर धुळे महानगरपालिकेने तापी पाणी पुरवठा योजनेतून येथील जामफळ धरणात पाणी सोडण्यास होकार दिला आहे.

आज महानगरपालिकेत सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि महापौर व नगरसेवकांच्या बैठकीत सोनगीरला तापीचे शुध्दीकरण न झालेले रॉ वॉटर देण्याचा निर्णय झाला. येत्या सोमवारी धरणात पाणी कधी सोडायचे याबाबत महानगरपालिकेतर्फे अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × three =