पिंपरी ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या  सब ऑफिसर आणि फायरमनला लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक (एसीबीने) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई अग्निशामक विभागाच्या पिंपरी, संत तुकारामनगर येथील कार्यालयात  शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास करण्यात आली.

सब ऑफिसर उदय माधवराव वानखेडे (वय 52,  रा. मदन मोहन हौसिंग सोसायटी, कामगार नगर, पिंपरी) आणि फायरमन अनिल सदाशिव माने, (वय 32, रा. शुभारंभ कॉलनी काळे कॉलनी आळंदी) या दोघांना 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पडकले आहे.

वानखेडे हे पिंपरी महापालिकेच्या अग्निशाक विभागात सब ऑफिसर या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. तर, अनिल माने हा फायरमन आहे. तक्रारदार यांचे वाकड सर्व्हे क्र 186 येथे बांधकाम चालू होते. बांधकामाचे फायर ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी तक्रारदार यांनी अग्निशामक केंद्र येथे प्रकरण दाखल केले होते. त्यासाठी वानखेडे यांनी प्रोव्हिजनल फायर ना हरकत प्रमाणपत्राची फाइलची पूर्तता करून वरिष्ठांकडे पाठविली होती. तक्रारदाराला त्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र देखील दिले होते. परंतु, या मोबदल्यात वानखेडे आणि माने यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपये लाच देण्याची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसबीने शनिवारी वानखेडे यांना तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची आणि माने याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − seven =