पिंपरी : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आश्रम शाळेतील आदिवासी मुलींवर अत्याचार करणा-या नराधमाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटिका वर्षा जगताप यांनी केली आहे.
जगताप यांनी याबाबत सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रामचंद्र शिक्षण संस्थेच्या नानाभाऊ कोकरे आश्रमशाळेत चौथीच्या वर्गात शिकणा-या एका मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे राज्यात चिंतेचे वातावरण आहे. या मुलीवर अत्याचार करणा-या इतुसिंग पवार या आरोपीवर कडक कारवाई करावी. राज्यातील आश्रमशाळेत होणारे गैरप्रकार थांबविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जावेत आणि ते कॅमेरे जिल्हा पोलीस मुख्यालयाशी जोडावेत. त्याचे 24 तास परिक्षण करण्यात यावे. तसेच आश्रमशाळेत फक्त महिला कर्मचारी आणि कामगार असावेत, अशीही मागणी जगताप यांनी केली आहे. निवेदनावर सोनल वाळुंज, ज्योती शिंदे, अपुर्वा पाटील, रुपाली माईनकर, मेघना जगताप यांच्या स्वाक्ष-या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + eighteen =