चौफेर न्यूज – पोलीस कोठडीत झालेल्या मारहाणीत अनिकेत कोथळे याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ही घटना उघड झाल्यानंतर डीएनए तपासणीसाठी सीआयडीच्या ताब्यात होता. पण सीआयडीकडून तब्बल दोन महिन्यांनी त्याचा मृतदेह आज त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

अनिकेत कोथळे याचा ७ नोव्हेंबर २०१७ रोजी सांगलीच्या पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या पोलीस साथीदारांनी यानंतर अनिकेतचा मृतदेह सिंधुदुर्ग येथील आंबोली घाटात जाळून टाकला होता. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. राज्यभर या प्रकरणाचे जोरदार पडसाद उमटले होते. तर, जाळण्यात आलेला अर्धवट मृतदेह डीएनएच्या वैद्यकीय कारणास्तव सीआयडीच्या ताब्यात होता. सीआयडीने डीएनए चाचणी पूर्ण झाल्यावर मृतदेह देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार अनिकेतचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाणार आहे. सकाळी ११ वाजता अनिकेतचे कुटुंबीय सीआयडी ऑफिसमध्ये जाऊन मृतदेह ताब्यात घेणार आहेत, अशी माहिती सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर विधिवत सर्व प्रक्रिया करुन मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 4 =