पालकमंत्री गिरीष बापट यांचे गौरवोद्गार
अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन
पिंपरी चिंचवड ः ज्या व्यक्तीला आयुष्यात पैशाची किंमत कळलेली असते. पैशाची किंमत काय ते घाम घाळूनच कळते. सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते अमित गोरखे हे आहेत. समाजात माणसाने जीवनांत कधी खचून जायच नसते. अमित गोरखे हे समाजप्रिय असलेले युवा नेतृत्व खर्‍या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री गिरीष बापट यांनी चिंचवड येथे युवा नेते अमित गोरखे यांच्या अभिष्टिचिंतन सोहळ्यात व्यक्त केले.
राजकीय नेत्यांची उपस्थिती…
पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आमदार महेश लांडगे, सदाशिव खाडे,माजी खासदार गजानन बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्विकृत सदस्य सुनील कदम, महेश कुलकर्णी, बाबू नायर, मधुकर बाबर, नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, सुजाता पलांडे, नामदेव ढाके, तुषार हिंगे, अनुप मोरे, शीतल शिंदे, प्रियंका बारसे, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, चंद्रकांता सोनकांबळे,अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, विलास जेऊरकर आदी होते.
गोरखे यांचे काम वाखण्याजोगे…
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, खासदार गजानन बाबर यांच्या अनुभव व मताला आम्ही प्राधान्य देऊ. पिंपरी विधानसभा आरपीआयला सोडला तर खासदार गजानन बाबर तुम्ही म्हणताल त्या व्यक्तीला आम्ही तिकिट देऊ. त्यामुळे योग्य त्या व्यक्तीचा पक्ष विचार करेल. शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील संगम म्हणजेच युवा नेतृत्व अमित गोरखे, असे म्हटले तर वागवे ठरणार नाही. त्यांच्या कामातील निष्ठा व सातत्य ह्या गोष्टी वाखाणण्या सारख्या आहेत, असे जगताप म्हणाले.
तरुण अभ्यासू नेतृत्व…
महापौर राहूल जाधव, आजपर्यंत त्यांनी केलेली कार्ये समाजात आदर्श निर्माण करणारी आहेत. लोकांना सुदृढतेचा मार्ग दाखवण्यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात, त्यामुळे या तरुण नेतृत्वाकडून अभ्यासू असण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. या दरम्यान अमित गोरखे यांनी चिंचवडच्या विविध भागांत वर्तमानपत्रे टाकण्याचे काम संदेश न्यूज पेपर एजन्सी मध्ये केले होते. त्या एजन्सीचे मालक रत्नकांत भोसले यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. नॉव्हेलचे संचालक विलास जेऊरकर यांचाही सत्कार पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आला. माजी खासदार गजानन बाबर, सिनेअभिनेते राहूल सोलापूरकर, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, मधुकर बाबर, यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे आभार अनुराधा गोरखे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =