चौफेर न्यूज – अमेठी दौरा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर एक पोस्टर लावण्यात आले आहे. राहुल गांधी यांना या पोस्टरमध्ये रामाच्या अवतारात दाखवण्यात आले आहे. तर रावणाच्या रूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाखवण्यात आले आहे. हे पोस्टर अमेठीतील गौरीगंज रेल्वे स्टेशनवर लावण्यात आले आहे.

रामाच्या रूपात दाखवण्यात आलेले राहुल गांधी धनुष्यबाण घेऊन रावणाच्या रूपात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान करत असल्याचे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये रावणाच्या रूपात दाखवण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गळ्यातून रक्त येते आहे असेही दाखवण्यात आले आहे. या पोस्टरवर ‘राहुल मे भगवान राम का अवतार’; २०१९ मे आयेगा राहुल राज (रामराज्य) असे लिहिण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने हे पोस्टर लावण्यात आपला कोणताही हात नाही असे म्हटले आहे. हे पोस्टर अभय शुक्ला नावाच्या एका स्थानिकाने लावले आहे अशी माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − eleven =