चौफेर न्यूज : शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात ‘अमोल कोल्हे यांना पाडणार’ अशा अर्थाची बॅनरबाजी राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांनी  केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच आव्हान मिळत असल्याची चर्चा होत आहेत.

शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांनी २००९ साली निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात अपयश आले होते. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळावी याकरिता त्यांचे कार्यकर्ते आग्रही होते. यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवारांसमोर घोषणाबाजी केली होती. दुसरीकडे कोल्हे यांना अपॆक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर झाली आहे. तीन वेळा प्रयत्न करूनही धोका दिलेली शिरूरची जागा काहीही करून मिळवायची असा चंग राष्ट्रवादीने बांधला असताना मात्र कोल्हे यांना कार्यकर्त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.  निवडणूक तोंडावर आलेली असताना कार्यकर्त्यांची नाराजी कोल्हे विरोधात जात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

 कोल्हेंच्या विरोधात काय लिहीले बॅनरवर

अमोल कोल्हे राष्ट्रवादीतून लढणार असतील तर त्यांना आम्ही आमची ताकद दाखवणार, अडचणीच्या काळात राष्ट्रवादीला साथ देणाऱ्या लांडे यांना उमेदवारी न दिल्याने कोल्हे यांना पाडण्याची भाषाही या बॅनरमध्ये केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 5 =