तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत केवळ पाच टक्के प्राप्तीकर

50 कोटीपर्यंतच्या कंपन्यांना प्राप्तीकरात 5 टक्के सवलत

 वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करून तसेच 3 ते 5 लाखापर्यंत केवळ 5 टक्के प्राप्तीकर लागू करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेठली यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. 50 कोटी पर्यंत उलाढाल असणा-या कंपन्यांनाही प्राप्तीकरात 5 टक्के सवलत देण्याची घोषणाही त्यांनी यांनी केली. रोख व्यवहारांसाठी तीन लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे. राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांच्या वर रोख देणगी स्वीकारण्यास बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना धनादेशाद्वारेच देणग्या स्वीकाराव्या लागणार आहेत.

 अर्थमंत्री अरुण जेठली यांनी लोकसभेत आज सर्वसाधारण अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. यावेळी पहिल्यांदाच रेल्वे आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्र सादर केला जाणार आहे. या वेळी प्रथमच फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

 खासदार ई अहमद यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर जेटली यांनी अर्थसंकल्प सादर केला.  अध्यक्षस्थानी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन होत्या.

 अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –

– 3 ते 5 लाखापर्यंत केवळ 5 टक्के प्राप्तीकर

 – 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही.

– 1 कोटींच्या उत्पन्नावर 15 टक्के कर

– छोट्या कंपन्यांना 30 ऐवजी 25 टक्के प्राप्तीकर 

 – पहिल्या टप्प्यांत आता केवळ 5 टक्के प्राप्तीकर

– निवडणूक आयोगाची सूचना सरकारकडून मान्य, राजकीय पक्षांना केवळ 2 हजारापर्यंतची देणगी रोख घेता येणार, 20 हजारांची मर्यादा 2 हजरांपर्यंत खाली आणली.

 – दोन हजारांवरील देणगी पक्षांना चेकने स्विकारता येणार

– 3500 किमी नवीन लोहमार्ग उभारले जाणार

–  500 रेल्वे स्टेशवर लिफ्टची सोय

– 2019 पर्यंत बायोटॉयलेट उभारणार

– ई-तिकिट खरेदी केल्यास सेवा कर लागणार नाही.

– महामार्गासाठी 64 हजार 900 कोटी

– 7 हजार रेल्वे स्टेशनवर सोलर सिस्टीम उभारणार

– तीर्थस्थळे पर्यटनस्थासाठी नवीन स्वतंत्र रेल्वे

– सैनिकांना तिकिटासाठी रांगेत उभे रहावे लागणार नाही

– रेल्वेच्या इतर 3 कंपन्यांचेही शेअर्स बाजारात सहभागी

– आयआरसीटीसीचे शेअर्सही विक्रीसाठी उपलब्ध

– 3 वर्षात 3.2 वित्तिय तूट

– 99 लाख लोकांनी अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न दाखवले, तर 52 लाख लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न दाखवले, 24 लाख लोकांनी 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दाखवले. तर केवळ 20 लाख व्यापा-यांनी  5 लाखाचे उत्पन्न दाखवले.

– पोस्ट ऑफीसमध्ये पासपोर्ट मिळणार

– आधारकार्ड द्वारे डेबिटकार्ड प्रमाणे खरेदी करता येणार

– स्टार्टअप कंपन्यांना 7 वर्षे करात सूट

– 3 लाखांवरील रोख व्यवहारांवर निर्बंध

– संरक्षण विभागासाठी 2 लाख 74 हजार कोटींची तरतूद

– वर्षभरात मिळकत करात 17 टक्क्यांची वाढ 34 टक्क्यांनी करदात्यांमध्ये  वाढ, मध्यमवर्गीयांना करातून सवलत

– देशातून पलायन करणा-यांची संपत्ती जप्त करण्याच्या कायद्यात बदल

– भीम अॅपमध्येही पेटीएमप्रमाणे कॅशबॅक सुविधा देणार

– 1 कोटी 25 लाख लोकांनी घेतले भीम अॅप

– पेट्रोल पंप आणि शाळांमध्ये पैशांच्या व्यवहारासाठी भीम अॅपचा वापर करता येणार

– 600 जिल्ह्यात पीएम कौशल्य विकास केंद्र उभारणार

– गर्भवती महिलांच्या खात्यात 6 हजार रुपये

– 2025 पर्यंच टीबी रोगाचा पूर्णपणे नायनाट करु

– 2022 पर्यंत 5 हजार लोकांना रोजगार प्रशिक्षण

– 60 टक्के गावांमध्ये शौचालय बांधणार

– तरुणांना ऑनलाईन शिक्षण देणासाठी स्वयंम नावाची योजना सुरु

– संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटी संकल्पद्वारा तरुणांना रोजगार प्रशिक्षण

– 2019 पर्यंत 1 कोटी लोकांना पक्की घरे देणार

– ग्रमीण भागातील विजेसाठी 4 हजार 500 कोटी तरतूद

– 60 टक्के गावांमध्ये शौचालय बांधणार

– 2018 पर्यंत प्रत्येक गावात वीज पोहोचवणार

– सडक योजनेला राज्य सरकार कडून 8 हजार कोटी

– टेक इंडिया आगामी वर्षातील अजेंडा

– वीजेसाठी 4 हजार 500 कोटींची तरतूद- पंतप्रधान सडक योजने अंतर्गत रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती, ग्रामीण सडक साठी 19 हजार कोटींची तरतूद

– पिकविम्यासाठी 9 हजार कोटी तरतूद

– दूध प्रक्रियेसाठी 8 हजार कोटी तरतूद

– 1 कोटी कुटुंब गरीबमुक्त करणार

– ग्रामीण भागासाठी 3 लाख कोटींची तरतूद
– मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद

-मनरेगा मध्ये महिलांचा सहभाग 55 टक्क्यांवर गेला,

– 3 वर्षात नाबार्डसाठी 20 हजार कोटींची तरतूद

– अर्थसंकल्पात युवक केंद्रस्थानी , देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा प्रयत्न

– शेतक-याना साडेपाच हजारांचे अनुदान

– सिंचनासाठी 5 हजार कोटींची तरतूद

– मागील अडीच वर्षात विआर्थिक विकासाला गती
– मागच्या अडीचवर्षात सरकारच्या कारभारात बदल झाला असून, लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे

– काळ्या पैशाच्या लढाईविरोधात नागरिकांनी केलेल्या सहकाराबद्दल आभार व्यक्त

– महागाईवर सरकारने नियंत्रण आणले

– विकास गरिबांपर्यत पोहोचवण्याचा सरकारने प्रयत्न केला.

– कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता हे मोठे आव्हान

– 2 वर्षात यंत्रणेमध्ये मोठा बदल

– कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता हे मोठे आव्हान

– अर्थसंकल्पाचा सर्व स्तरातील लोकांना फायदा होणार

– आयएमएफ’च्या मते भारत ही २०१७ मधील सर्वात वेगाने पुढे जाणारी अर्थव्यवस्था

– कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारातल्या किमती अजून कमी होण्याची शक्यता- अर्थमंत्र्यांचे सूतोवाच

– उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक

– गेल्या वर्षांत परकीय गुंतवणूक वाढली, 2017 मध्ये विकासाचा दर वाढेल

– सरकारकडून गतीशील प्रशासनाचे आश्वासान

– विकासात जिएसटीची महत्वलाची भूमिका

– नोटबंदीचा दीर्घकालीन भ्रष्टाचार मुक्तीसाठी फायदा

– डाळीच्या उत्पादनात मोठी वाढ झाली

– पुढील 2 वर्षात विकासदर 7 टक्क्यांवर

– नोटबंदीमुळे बँकांच्या व्याजदरात कपात, नोटबंदीमुळे बँकांच्या व्यवहारात पैसा आला, नोटबंदीमुळे सरकारी महसुलात वाढ

-बजेटचा भर ग्रामीण विकास आणि दारिद्र्य निर्मुलनावर

– जनधन आधार मोबाईल बँकींगमध्ये वाढीचा प्रयत्न

– शेतक-यांचे उत्पन्न पाचवर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध

– रेल्वे अर्थसंकल्प बंद झाला तरी रेल्वेची स्वायत्तता कायम

– एफडीआयमध्ये 36 टक्क्यांनी वाढ

– परकीय गंगाजळीत मोठी वाढ

– शेतक-यांसाठी 10 लाख कोटी कर्जाची तरतूद

– कृषीदरात यावर्षी 4 टक्क्यांची वाढ

– शेती उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त

– तरुणांना शिक्षण नोक-यांवर बजेटमध्ये भर

खासदारांच्या निधनामुळे अर्थसंकल्प सादर करण्यावर होती अनिश्चितता 

खासदार ई अहमद (वय 78 ) यांच्या निधनामुळे आज (बुधवारी) सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प सादर करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र अर्थसंकल्प आजच सादर होणार आहे.  एखाद्या खासदाराचे निधन झाल्यानंतर लोकसभा तहकुब करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आज सादर करण्यात येणारा अर्थसंकल्प सादर होतो की नाही यावर प्रश्नचिन्हा निर्माण झाले होते. खासदाराचे निधन झाल्यानंतर लोकसभा तहकूब करण्याचे सर्व अधिकार हे लोकसभा अध्यक्षांनाच असतात.

ई अहमद यांना काल (मंगळवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केरळमधील मल्लापुरम लोकसभा मतदारसंघाचे ई अहमद खासदार होते. तसेच, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पाड पाडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

6 − 2 =