चौफेर न्यूज – अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणी गेल्या १ हजार ६६७ दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसारामला जोधपूर एससी आणि एसटी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी धरण्यात आले, तर याप्रकरणातून प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात ६ नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. पोक्सो कायद्याअंतर्गत आसारामविरोधात जुवेनाईल जस्टिस्ट अर्थात अल्पवयीन न्याय आणि आयपीसीच्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिल्लीपासून जोधपूरपर्यंत हा निकाल येण्याआधीच सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जोधपूरला तर छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. ज्याप्रकारे राम रहीमचा निकाल आल्यानंतर त्याच्या अनुयायांनी दिल्लीसह अनेक ठिकाणी हैदोस घातला, तशीच परिस्थिती यावेळीही होण्याची शंका पोलिसांना असून आसाराम दोषी ठरल्यास त्याचे समर्थक गोंधळ घालू शकतात अशी शक्यता वर्तवली जात होती.

मुलीच्या आरोपानुसार, जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने १५ आणि १६ ऑगस्ट २०१३च्या रात्री उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केले होते. १९ ऑगस्ट २०१३ रोजी दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × five =