चौफेर न्यूज हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये यावर्षी महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार आहे. यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि रोजगार, व्यवसाय मिळण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी भोसरी येथे केले.

आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी (दि. 11 जून) भोसरी येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना कांबळे बोलत होते. नमाज पठण मौलाना अजिजी, मौलाना आझाद, मौलाना मारुफ, मौलाना अबरार यांनी केले. यावेळी महापौर नितीन काळजे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस उपायुक्त सतिश पाटील, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष भाईजान काझी, फजल शेख, पक्षनेते एकनाथ पवार, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भीमाताई फुगे, निर्मला गायकवाड, योगिता नागरगोजे, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, नगरसेवक राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे, संतोष लोंढे, तुषार हिंगे, कुंदन गायकवाड, सागर गवळी, माजी नगरसेवक बबन बोराटे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, अस्लम शेख, झिशान सैय्यद, अजहर खान, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, भोसरी पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, भोसरी एमआयडीसी पोलिस निरीक्षक भिमराव शिंगाडे, निगडी पोलिस निरीक्षक दिनकर आवताडे आदी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणानुसार अल्पसंख्यांक समाजाला देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्तीला संविधानानुसार शिक्षणाचा हक्क आहे. त्यानुसार अल्पसंख्यांक समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती दिली जाईल. हज यात्रेच्या अनुदानातून वाचलेले दोनशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकार अल्पसंख्यांक समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी वापरणार आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण आणि रोजगार, व्यवसाय मिळण्यासाठी मदत होईल. यातूनच ‘सबका साथ सबका विकास’ हे ध्येय गाठणे शक्य होईल, असेही कांबळे म्हणाले.

कार्यक्रमाचे आयोजक आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी उपस्थितांना रमझान निमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या संयोजनात आमदार पै. महेशदादा स्पोटर्स फाऊंडेशन मित्र परिवार व पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम महासंघाच्या सर्व पदाधिका-यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 3 =