चौफेर न्यूजभारताची ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच असून राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या अवघ्या १५ वर्षाच्या म्हणजेच नववी/दहावीत शिकणाऱ्या पोराने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले.

२५ मीटर रॅपिड फायर पिस्टल प्रकारात विक्रमी कामगिरी करत अनिश भानवालाने सुवर्णभेद केला. तब्बल ३० गुण मिळवत अनिशने विक्रम रचला. अनिश हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे. अनिशच्या या कामगिरीने भारताच्या खात्यात १६ सुवर्णपदके जमा झाली आहेत. अनिशसमोर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा २० वर्षीय नेमबाज सर्जी वेग्लेव्स्की आणि इंग्लंडचा २८ वर्षीय सॅम गोविन यांचे आव्हान होते. १५ वर्षीय अनिशने हे आव्हान मोडित काढत जबरदस्त कामगिरी केली. अनिशला ३० तर, रौप्यपदक पटकावणाऱ्या सर्जी वेग्लेव्स्कीला २८ तर कांस्यपदक मिळवणाऱ्या सॅम गोविनला १७ गुण मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 4 =