‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ आंतर माहिती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा
 
व्हाईट कॉपर आयोजित ‘पृथ्वी एडिफाईस करंडक’ आंतर माहिती तंत्रज्ञान ट्वेन्टी-20 अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत अ‍ॅटॉस आणि टीसीएस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
 

नेहरू स्टेडियमच्या मैदानावर झालेल्या या सामन्यामध्ये उमेश मोमिन याने केलेल्या 59 धावांच्या जोरावर अ‍ॅटॉस संघाने टीएटो संघाचा 5 गडी राखून पराभव केला. दुसर्‍या सामन्यामध्ये विक्रमजीत सिंग याने केलेल्या नाबाद 60 धावांच्या जोरावर टीसीएस संघाने अ‍ॅमेडॉक्स् संघाचा 29 धावांनी पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकालः उप-उपांत्यपूर्व फेरीः 1) टीएटोः 20 षटकात  7 गडी बाद 134 धावा (गणे श आंबे्र 40 (30, 5 चौकार), धनाजी कलाके 25, विक्रम माळी 22, सुमेध मनवाई 2-21) पराभूत वि. अ‍ॅटॉसः 18.3 षटकात 5 गडी बाद 136 धावा (उमेर मोमीन 59 (53, 7 चौकार), महेश भोसले 31 (21, 5 चौकार), झैनिल शेख 3-34); सामनावीर- उमेर मोमिन;
 

2) टीसीएसः 20 षटकात 4 गडी बाद 180 धावा (मयांक जसोरे 47 (34, 9 चौकार), विक्रमजीत सिंग नाबाद 60 (47, 7 चौकार, 1 षटकार), सुविश नायर 35 (18, 5 चौकार, 1 षटकार), राहूल गर्ग 21 (9, 4 चौकार), मितेश मयेकर 2-43) वि.वि. अमेडॉक्स्ः 20 षटकात 10 गडी बाद 151 धावा (अमित जोशी 61 (39, 9 चौकार, 1 षटकार), निखील पेंढारकर 25, शैलेंद्र बकाळे 20, भावनिश कोहली 23, गौरव सिंग 2-24, सिध्दार्थ एम. 2-14); सामनावीरः विक्रमजीत सिंग;

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 3 =