पिंपरी ः अ‍ॅपल कंपनीचा लोगो वापरून बनावट बॅटरी, स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर, डिस्प्ले, हेडफोन या सारखे साहित्य विकणार्‍या चौघा जणांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 15) चारच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी डिलक्स चौक येथील मॉलमधल्या दुकानात केली. वसनाबाई मनकाजी रब्बारी (वय 20, रा. साईचौक, मूळ रा. गुजरात), मोहबताराम पिराजी चौधरी (वय 19, रा. पिंपरीगाव), गणेश भगवानरामजी चौधरी (वय 21, रा. पिंपरी), जामताराम जेठाराम चौधरी (वय 24, रा. साईचौक, मूळ रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे पिंपरीतील डिलक्स चौकातील मॉलमध्ये मोबाईल साहित्यांचे दुकान आहे. या दुकानात आरोपी हे अ‍ॅपल आणि इतर बड्या मोबाईल कंपनीचे लोगे वापरून मोबाईल बॅटरी, स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर, डिस्प्ले, हेडफोन असे बनावट साहित्य विकतात अशी माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दुकानावर धाड टाकली. यामध्ये त्यांना बर्‍याच बनावट वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी ते साहित्य जप्त करुन चौघांवर कॉपीराईट कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty + five =