चौफेर न्यूज ब्राझीलचा विश्वचषक विजेत्या संघातील फुटबॉलपटू रोनाल्डिनोने अधिकृत निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ३७ वर्षीय रोनाल्डिनो हा आंतराष्ट्रीय फुटबॉलपासून दूर आहे.

त्याच्या निवृत्तीबाबत माहिती देताना रोनाल्डिनोचा बंधू आणि समन्वयक रॉबटरे अ‍ॅसिसने सांगितले की, यापुढे आंतरराष्ट्रीय फुटबॉल रोनाल्डिनो खेळणार नाही. फुटबॉलसाठी निवृत्तीनंतर खूप काही करण्याची त्याची इच्छा आहे. रशियामध्ये पुढील वर्षी होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर तो त्याची भूमिका स्पष्ट करेल. १९९९ ते २०१३ या कालावधीमध्ये रोनाल्डिनोने ९७ सामन्यांमध्ये ब्राझीलचे प्रतिनिधित्व करताना ३३ गोल केले. त्याचा २००२च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या संघात समावेश होता. रोनाल्डिनोने त्या स्पर्धेत दोन गोल केले होते. २००३-०८ या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्लब कारकीर्द ग्रेमिओपासून सुरू करणाऱ्या रोनाल्डिनोने बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व केले. याच काळामध्ये २००५मध्ये रोनाल्डिनोला प्रतिष्ठेच्या ‘बॅलन डी ऑर’ पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × two =