चौफेर न्यूजखासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रयत्नातून आकुर्डी स्टेशन वरती नव्याने उभारण्यात आलेल्या टिकीट घराचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या  हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी पुणे रेल्वेचे महा प्रबंधक  मिलिंद देऊस्कर, सिन प्रबंधक  कृष्णाथ पाटील, रेल्वेचे अधिकारी विकास कुमार , शहर प्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, गजानन चिंचवडे, रेल्वे कामिटीचे सदस्य बशीर सुतार, अमोल निकम, भाविक देशमुख, निखील पांढरकर, ज्ञानेश्वर शिंदे रेल्वेचे अधिकारी  व  इतर सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

आकुर्डी रेल्वेस्टेशन येथे प्राधिकरणाच्या बाजुने तिकिट काऊंटर होते. रेल्वे प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रेल्वे जीना क्रॉस करूण जावे लागत होते. खासदार बारणे यांच्याकडे या विभागातील नागरिक व प्रवासी संघटनांनी सातत्याने तिकीट घर वाल्हेकरवाडी गुरूद्वाराच्या बाजुने करण्याची मागणी करत होते. प्रवाशांची मागणी विचारात घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरूद्वारा वाल्हेकरवाडी या बाजुने नव्याने तिकीट घर उभारले त्याचा उद्घाटन समारंभ बारणे यांच्या हस्ते पार पडला.

खासदार श्रीरंग बारणे या प्रसंगी म्हणाले, सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी गुरूद्वारा, वाल्हेकरवाडी या आकुर्डी रेल्वेस्टेशनच्या हद्दीत नवीन तिकीट घर उभारले असून प्रवाशांना याचा फायदा होईल. रेल्वे प्रवाशांच्या अनेक समस्या असून त्यामार्गी लावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आकुर्डी रेल्वेस्टेशनच्या हद्दीत नव्याने तिकीट घर बांधले आहे. या आगोदर चिंचवड रेल्वेस्टेशनवर ही अशाच प्रकारची सुविधा प्राप्त करूण दिली आहे. मावळ मतदार संघातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सर्व रेल्वे स्टेशन वर सुविधा रेल्वे विभागाच्या वतीने पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 15 =