चौफेर न्यूज –  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेत सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.

मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चिखले यांच्यासह पक्षाच्या शहर पदाधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षाचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी शहरातील मनसैनिकांची नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यापुढे शहरात जाणिवपूर्वक लक्ष घालणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे मनसे पदाधिका-यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागला आहे.

पक्षवाढीसाठी मनसेच्या विविध संघटनांची कार्यकारिणी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठीच सेनेच्या कार्यकारिणीतील विविध पदे रविवारी जाहिर करण्यात आले. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते पदाधिका-यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यामध्ये अक्षय नाळे (सचिव), अनिकेत प्रभु (उपशहर अध्यक्ष), अमित तापकीर (उपशहर अध्यक्ष), गौरव लोटलीकर (विद्यार्थी उपशहराध्यक्ष), प्रतिक शिंदे (विभाग अध्यक्ष), सचिन शिंदे (विभाग अध्यक्ष), बंटी कदम (विभाग अध्यक्ष), महेश येवले (विभागाध्यक्ष) आदी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × three =