चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड जिल्हा योग संस्था व क्रीडा भारती पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 8 व्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत श्रेया विभांडीक, इशान देशमुख, समिक्षा महाले, साहिल गुंड, स्वरदा देशपांडे, श्रीकांत मधुकर, पुजा इंगवले, देवदत्त भारदे, रूपाली तरवडे यांनी विविध गटात प्रथम क्रमांक पटकाविले.

यमुनानगर येथील मॉडर्न विद्यालयात झालेल्या स्पर्धेचे उद्‌घाटन मॉडर्न विद्यालयाचे इनामदार सर, कांचन ठाणावाला, ज्ञानप्रबोधिनी क्रीडाकुलचे प्रमुख भगवान सोनवणे, डॉ. बोरकर, दिनेश कुलकर्णी, भारतीय योगा संघाचे कर्णधार, प्रशिक्षक चंद्रकांत पांगारे आदींच्या हस्ते झाले.

यावेळी 6 ते 10, 10 ते 15, 15 ते 22, 22 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 65 आणि 65 वर्षापुढील अशा महिला व पुरूष मिळून 16 वयोगटात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतून  48 स्पर्धकांचा संघ 29 एप्रिल रोजी औरंगाबाद येथे होणाऱ्या 8 व्या राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड करण्यात आला.     बक्षिस वितरणासाठी नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेविका सुमन पवळे, धाहोत्रे सर, रमेश सूयवंशी आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढीलप्रमाणे ः 6 ते 10 वयोगट मुली- श्रेया विभांडीक, रूचा पवार, संजना खामकर, रूचिका खामकर, कातिर्की सोनवणे, विशाखा पवार. मुले ः इशान देशमुख, अक्षय लोळगे, श्रेयश ननवरे, वेदांत परब, गिरीष देशमुख, राजदम चौधऱी.

11 ते 15 वयोगट, मुली

समीक्षा महाले, पूर्वा ठाकूर, गीता शिंदे, श्रृती सावंत, आर्या गोगावले, श्रावणी म्हस्के. मुले ः साहिल गुंड, सिध्दांत फाळके, सुनिलकुमार पंत, अर्थव गुरव, अदित्य खंडागळे, शंतनू सकट.

16 ते 22 वयोगट, मुली

स्वरदा देशपांडे, नुपूर मोरे, रूचिका भांगवे, नम्रता गायकवाड, अमृता कदम, ऋतुजा गायकवाड., मुले ः श्रीकांत मधुकर, अैदुत गोगवले.

23 ते 30 वयोगट, महिला

पुजा इंगवले, अर्चना निंबाळकर, दिपाली परब, योगिता महाडिक,  हेमलता गायकवाड, मेनका केदळे., पुरूष ः देवदत्त भारदे, सुकेत शहा, जर्नादन लाड, प्रमोद उगले.

31 ते 40 वयोगट महिला

रूपाली तरवडे, विश्वरूपा चतृजी, विद्या महाले, शमिला ननवरे, रश्मी दुसने, सपना दुसने. पुरूष ः राजेश ननावरे, मनोज रूदरेखा, विक्रांत सकपाळ, संकेत दळवी, महेंद्र शेटे, मिलिंद देशमुख.

41 ते 50 वयोगट महिला

शालिनी आव्हाड, रेखा इंगोले, दया आद्रे, निता गोगावले, वासंती जाधव, जयश्री अमुतकर., पुरूष ः घनश्याम कांचन, नलिन छत्री, किरण घाटबांधे, रविंद्र कोढाळकर, दिपक बेंद्रे, कालिदास सूर्यवंशी.

51 ते 60 वयोगट महिला.

सिंधू मोरे, संगिता दामले, मधुवंन्ती हासाबिन्स, अनुराधा अबिंकर, सुभदा दालवाले., पुरूष ः बन्सीराम फाळके, गोविंद शिराळे, संपत भिटे.

60 वर्षांपुढील पुरूष ः शांतीकुमार कराका, दत्तात्रय कोहली यांनी योगा स्पर्धेत यश मिळविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + 6 =