पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानाला केवळ दहा दिवस उरले आहेत. या कालावधीत मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी महापालिकेतर्फे पथनाट्य, फलक, प्रचार गीता बरोबरच आता  मतदानाची माहिती देणारी अॅनिमेशन फिल्मही तयार करण्यात आली आहे.

यंदा मतदारांना चार उमेदवारांना मतदान करायचे आहे. त्यामुळे मतदारांना मतदान कसे करायचे याची माहिती या अॅनिमेशन फिल्ममध्ये देण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कशी सोय असेल. मतदारांनी चार उमेदवाराला मतदान कसे करायचे याबाबत माहिती देण्यात आली आहे. अॅनिमेशनमुळे अगदी मतदान प्रक्रिया चित्ररुपात मतदारांना पहाता येणार आहे.

या अॅनिमेशन फिल्मला आवाज अभिनेते राहूल सोलापुरकर यांनी दिला आहे. महापालिकेतर्फे ही फिल्म व्हॉट्स अॅप, फेसबूक, महापालिका संकेतस्थळ आदीवर प्रसारीत करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेपर्यंत शक्य त्या पद्धतीने पोहचून  मतदानाबद्दल जनजागृती करण्यावर महापालिकेचा विषेश भर देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 − one =