चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना आर्थिक विषयाचे ज्ञान होण्यासाठी आनंद मेळावा घेण्यात आला. विद्यार्थी व पालकांनी मेळाव्यात सहभागी होत विविध खाद्य पदार्थांचा आनंद लुटला. मोठ्या उत्साही वातावरणात शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील, अनिता माळी, कविता देशमुख, स्मिता नेरकर, इंद्रजित देशमुख उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या स्वागतासाठी सुंदर अशी रांगोळी काढून आनंद मेळाव्याचे वर्णन करणारे सुबक असे फलक रेखाटण्यात आले होते. दरम्यान, संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील, प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे यांच्याहस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. तसेच, उपस्थित मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला.

आनंद – मेळावा निमीत्ताने पालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खाद्य पदार्थांची थाळी सजावट स्पर्धा घेण्यात आली. यावेळी, थाळी सजावत स्पर्धेचे परिक्षण प्रमुख अतिथींनी केले. या स्पर्धेत स्नेहल खैरनार, चेतना अहिरे, शितल शिंदे, प्रणिता दशपुते, शितल अहिराव, मेघा बोंद्रे, कुमुदिनी विसपुते, निलेश मानकर, दिपाली कुवर, माधुरी बागुल, कविता पाटील या पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तसेच, प्रथम क्रमांक- कुमुदिनी विसपुते, द्वितीय – निलेश मानकर, तृतीय- दिपाली कुवर तर उत्तेजनार्थ क्रमांक – स्नेहल खैरनार यांनी मिळविला. स्पर्धेनंतर आनंद मेळाव्यास सुरुवात झाली. यामध्ये, पालकांनी खाद्य पदार्थाचे विविध स्टॉल लावले होते. त्यात. प्रणिता दशपुते, मेघा बोंद्रे, भारती पाटील, सोनाली भदाणे, वर्षा निकम, दिपाली खैरनार, उज्ज्वला बिरारीस, शितल अहिराव, कविता भदाणे, माधुरी बागुल, मोनाली कोठावदे, चेतना अहिरे, विजया मनोरे, स्नेहल खैरनार, कुमोदिनी विसपुते, चेतना बिरारीस, संगिता कोठावदे, निलेश मानकर या स्टॉलवरून विद्यार्थ्यांनी पदार्थांचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमात खाद्य पदार्थासोबत विविध मनोरंजक खेळणी, पाळणा, जम्पींग बेड, जादुगार, मोफत मेहंदी, थ्रो कॉईन असे विविध खेळ विद्यार्थ्यांसाठी मोफत खेळांचे आयोजन शाळेमार्फत करण्यात आले होते. संपूर्ण दिवसभर विद्यार्थ्यांनी या साहित्यांचा व खेळांचा पदार्थाचा उपभोग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, निलीमा देसले, आश्विनी पगार, पूनम बिरारीस, पूनम तवर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी आहिरे, संगिता कोठावदे, जयेश घरटे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × 1 =