अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या सूचना
 
पिंपरी चिंचवड ः नदी पात्रालगत पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसण्याची शक्यता असते. त्या ठिकाणे योग्य उपाय योजना कराव्यात, गटारे, नाले साफसफाई तत्काळ पुर्ण करावे, याबाबत सविस्तर सुचना संबंधित विभाग प्रमुख अधिकार्‍यांना देण्यात आल्या. तसेच अन्य विविध सोयी-सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आपत्ती व्यवस्थापन आराखडा योग्य त्या सुचना काटेकोर पालन करावे, अशी सुचना अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिल्या.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभागृहात मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठक घेण्यात आली. यावेळी सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, वैद्यकीयचे डॉ.पवन साळवे, अग्नीशमनचे किरण गावडे  यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
धोकादायक जागांचे सर्वेक्षण…
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. पावसाळ्यात वादळी वार्‍यासह झाडे उन्मळून पडून मनुष्य व वित्तहानी होऊ नये, यासाठी धोकादायक वृक्षांची छाटणी करावी, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या आपत्तीजनक घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी. नदीपात्रालगत, पात्रातील झोपटपट्ट्या व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून उपाययोजना ठरवाव्यात, नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढणे तसेच धोकादायक जागांचे सर्वेक्षण करावे. गटार सफाई आणि औषध फवारणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पूर परिस्थितीमध्ये आपत्ती घटना घडल्यानंतर रिस्पॉन्स टाईम (प्रतिसाद कालावधी) हा कमीत कमी कसा राहील, याची जबाबदारी विभाग प्रमुखांची राहणार आहे.
व्यवस्थापनाची तयारी पूर्ण करावी…
दरम्यान, पावसाळी पुर्व कामकाजाचे योग्य नियोजन सर्व विभागाने करावे, विविध आवश्यक सोयी-सुविधा सज्ज ठेवाव्यात, आरोग्य, पाणी पुरवठा, जलनिःस्सारण, वैद्यकीय, स्थापत्य यासह विविध विभागानी आपत्ती व्यवस्थापनाची तयारी पुर्ण करावी, तसेच नदी पात्रालगतच्या भागांमध्ये पाणी शिरणारी ठिकाणे निश्‍चित करा, पाणी शिरणार्‍या भागातील रहिवाशांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करा, सर्व जुने पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई करा आणि 31 मे पर्यंत सर्व बाबींचा एकत्रित आराखडा सादर करावा, असेही पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − ten =