पिंपरी  (दि. 20 एप्रिल 17): शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यंदा भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. फुलगांव आश्रम येथील प. पू. स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

प्रोग्रेसिव्ह एज्यूकेशन सोसाटी, पुणे संचलित निगडी-यमुनानगर येथील मॉडर्न शैक्षणिक संकूलात येत्या रविवारी (दि.23) सायंकाळी 6.00 वाजता पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे वसंत व्याख्यानमालेचा सांस्कृतिक उपक्रमही सुरू आहे. यामध्ये दिलीप हल्याळ, स्मिता ओक, प्रकाश ऐदलाबादकर, विश्‍वास मेहेंदळे, मिलिंद जोशी, गणेश शिंदे, माणिक गुट्टे,  प्रा. अरुण घोडके आदी मान्यवर विविध विषयांवर विचारमंथन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + 18 =