पिंपरी : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पिंपरी चिंचवड भोसरी शाखा आणि गॅस्ट्रो हब क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे आयोजित केलेल्या पोटविकार तज्ज्ञांच्या (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीस्ट) दोन दिवसीय परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी एक लाइव्ह एंडोस्कोपी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेदरम्यान गॅस्ट्रो हब क्लिनिकमध्ये ऑपरेशन केले गेले. हॉटेल सिट्रसमध्ये सहभागी झालेल्या थेट प्रसारित  करण्यात आली. प्रसारित केलेली ती शस्त्रक्रिया पोट विकार तज्ज्ञांनी अनुभवली. यावेळी विविध विषयांवर व्याख्यान झाले.
फिलिपाईन्सचे ज्येष्ठ पोट विकार तज्ज्ञ डॉ. आर्मन ले, पुण्यातील प्रसिद्ध एन्डोस्कोपिस्ट डॉ. अमोल बापये यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. मंदार डोइफोडे, डॉ. महेश महाडिक, डॉ. पंकज नेमाडे, डॉ. अद्वय आहेर, डॉ. प्रताप गोळे यांनी लाइव्ह शस्त्रक्रिया करून दाखवली. बदलत्या जीवन शैलीमुळे सध्या नागरिकांमध्ये पित्ताशयाचे खडे व स्वादुपिंडाचे आजार वाढत आहे. या रोगाचे निदान करण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग होतो. या रोगाचे वेळीच निदान व उपचार न केल्यास कर्करोगासारखे दुर्धर आजार होवू शकतात, असा सुर मान्यवर तज्ञांनी काढला.
आयएमए पिंपरी चिंचवड भोसरी शाखेचे संस्थापक डॉ. दिलीप कामत, अध्यक्ष डॉ. संजय देवधर, सचिव डॉ. संजीव दात्ये यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी एंडोस्कोपीक अल्ट्रोनो ग्राफी, अत्याधुनिक प्रगत एंडोस्कोपीक शस्त्रक्रिया या थेट कार्यशाळेत प्रथमच दाखविण्यात आले. परिषदेत पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 200 हून अधिक वैद्यकीय तज्ज्ञ सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 2 =