चौफेर न्यूज – बालकांचा सक्तीचा आणि मोफत शिक्षण  अधिकार कायदा 2009 अनव्ये 25 % आरक्षण प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून 28 फेब्रुवारी पार्यंत अर्ज भरण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत  पुर्व प्राथमिक वर्गातील  नर्सरी, ज्यू.केजी., सिनियर केजी व इयत्ता पहिली च्या वर्गातील प्रवेश घेण्यात येईल. कोणतेही डोनेशन नाही, इयत्ता आठवी पर्यन्त मोफत शिक्षण ही या योजनेची वैशिष्ट्ये आहेत. मात्र अल्पसंख्याक शाळांचा या मध्ये समावेश नाही . या योजने संदर्भात इच्छुक पालकांची बैठक नगरसेवक जावेद शेख यांनी आयोजित केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आण्णा कुराडे, वसंत सोनार,  ज्ञानेश्वर ननावरे,  सुभाष चौधरी, प्रकाश परदेशी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 1 =