चौफेर न्यूज – इंडीयन बिझनेस क्लबच्या (IBC)च्या वतीने पिंपरी चिंचवड मधील एमएसएमई (सुक्ष्म लघु मध्यम उद्योजक) उद्योजकांना व कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी (पुणे) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत इंडीयन बिझनेस क्लबचे (आयबीसी) संस्थापक अध्यक्ष अनिल मित्तल यांनी माहिती दिली.

शनिवारी, रविवारी (दि. 10 ते 11 फेब्रुवारी) रोजी परंदवडी, उर्से (ता. मावळ) येथील वेदांन्त स्पोटर्स ॲकेडमीच्या क्रिडांगणावर या लॉन टेनिस क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. यामध्ये पिंपरी चिंचवड मधील एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. स्टिल केस, स्ट्राईकर्स, आयबीसी रॉयल, रवी ॲव्हेंजर्स, एडीयंट आर्या, जेसीबी लॉयन्स, जय भवानी वॉरीयर्स, रोहित रायझिंग स्टार्स, आणि वसंत जग्वार्स हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उद्‌घाटन शनिवारी सकाळी 8 वाजता आणि स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ रविवारी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

विजेत्या संघांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रायोजक वसंत ग्रुप, सह प्रायोजक के. मिंन्ट, आयव्हरी स्पेसेस आहेत. आयोजक केलक्टिव्ह मार्केटिंग ॲण्ड सर्व्हिसेस आणि धनलक्ष्मी इंटरप्राईजेस हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − three =