चौफेर न्यूज – आरक्षणावरून मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याने केलेल्या वक्तव्यामुळे भाजपसमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून आरक्षणविरोधी राग शिवराज सिंह सरकारमधील मंत्री गोपाळ भार्गव यांनी आळवला आहे. देश आरक्षणामुळे कमजोर होतो. आरक्षण प्रतिभेच्या आधारावर देण्यात यावे असे त्यांनी म्हटले. ४० टक्केवाल्याला जेव्हा ९० टक्क्याच्या आधी स्थान दिले जाते. देश तेव्हा मागे पडू लागतो. राष्ट्रासाठी जे घातक आहे. हा ब्राह्मणांचा नव्हे तर प्रतिभेचा अपमान असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. गोपाळ भार्गव मध्य प्रदेशातील नरसिंहपूर येथे परशुराम जयंतीनिमित्त ब्राह्मण समाज मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, भार्गव यांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे स्पष्ट केले असून आरक्षणाचा मी आदर करतो. माझ्या भाषणात कुठेही आरक्षण असा शब्द नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

भार्गव पुढे म्हणाले, देश जेव्हा स्वतंत्र झाला होता. तेव्हा आपल्या समाजाचे (ब्राह्मण) एक चतुर्थांश खासदार-आमदार, कर्मचारी, अधिकारी होते. हा आकडा आता केवळ १० टक्के एवढाच राहिला आहे. ही संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. याचे कारण पूर्वी नीती होती आणि अनिती आहे. ब्राह्मणांचे समर्थन प्रत्येक पक्षाला हवे आहे. पण त्यांना द्यायचे तर काहीच नाही. आपण आज फक्त व्होट बँक झालो आहोत. पूर्वी इतर जाती जशा होत्या तशी आपली अवस्था झाली आहे. ब्राह्मणांनी सरकारकडे काही मागणी केलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + 14 =