पिंपरी चिंचवड ः बुद्ध पौर्णिमे निमित्त पिंपरी येथील मिलिंदनगर येथे संदीप वाघेरे युवा मंच, सुरेशभाऊ निकाळजे मित्र परिवार, इक्वीटास स्मॉल फायनान्स बॅक, लॅण्डमार्क ग्रुप, अपोलो टेली हेल्थ सर्व्हिसेसच्या सहकार्याने सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ अनेक नागरिकांनी घेतला. सदर कार्यक्रमाचे नियोजन संदीप वाघेरे युवा मंचच्या कार्यकर्त्या रंजना जाधव, शुभम शिंदे, आकाश चव्हाण यांच्यामार्फत करण्यात आले. संसर्गजन्य आजारापासुन लोकांना जागरुक करुन त्यांची तपासणी करणे व समुपदेशन करणे तसेच विविध आजारांविषयी अनेकप्रकारची माहिती या शिबिरात देण्यात आली. या शिबिरामार्फत रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण, शरिरातील फ़ॅटची तपासणी, डोळे तपासणी, अशा अनेक आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 − six =