आशिया चषक स्पर्धेत भारताची विजयाची हॅटट्रिक, मलेशियावर २-० ने मात

0
228

चौफेर न्यूज – महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने सलग तिसरा विजय नोंदवत गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात भारतीय महिलांनी मलेशियाच्या संघावर २-० ने मात केली. याआधी भारतीय संघानी सिंगापूर आणि चीनला पराभवाचा धक्का दिला आहे. ९ गुणांसह भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

सिंगापूर आणि चीनविरुद्ध सामन्याच्या तुलनेत मलेशियाच्या संघाने आज भारतीय महिलांना चांगलच झुंजवलं. अखेर वंदना कटारिया (५४ वे मिनीट) आणि गुरजित कौर (५५ वे मिनीट) यांनी लागोपाठ गोल करत भारताचा विजय सुनिश्चीत केला. पहिल्या सत्रात मलेशिया आणि भारताने बचावात्मक खेळ केल्यामुळे गोलपोस्ट रिकामीच राहिली. दुसऱ्या सत्रात मलेशियाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची सुरेख संधी चालून आली होती. मात्र भारतीय बचावपटूंनी मलेशियाचे प्रयत्न हाणून पाडले. यानंतरत मध्यांतरानंतरच्या सत्रातही दोनही संघाकडून गोल करण्याचे जोरदार प्रयत्न झाले, मात्र कोणत्याही संघाला यात यश आलं नाही.

हा सामना बरोबरीत सुटणार असं वाटत असतानाच, वंदना कटारियाने मैदानी गोल करत भारताचं खातं उघडलं. यापाठोपाठ गुरजित कौरने पेनल्टी कॉर्नवर गोल करत पाठोपाठ भारताला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. यानंतर सामना संपण्याच्या वेळेस मलेशियाच्या खेळाडूंनी गोल करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय खेळाडूंचा बचाव भेदणं त्यांना जमलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − 10 =