मोशी ः आदिवासी वसतिगृहातील जिन्यावरून पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि. 3) सायंकाळी मोशी येथे घडली. अमित गणपत वळवी (वय 25, रा. मु. कलीबेल, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. अमित प्राधिकरण मोशी येथील पेठ क्रमांक सहातील जलवायू विहार येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात राहतो. सोमवारी सायंकाळी तो जिन्यावरून खाली पडला. मात्र तो कितव्या मजल्यावरून पडला याबाबत ठोस माहिती पोलिसांच्या हाती आलेली नाही.

सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी काही विद्यार्थ्यांचा जबाब नोंदविला आहे. मात्र तो शुद्धीवर आल्यावरच तो कसा पडला याबाबत माहिती मिळेल, असे तपास अधिकारी सहायक निरीक्षक बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेली मेस सेवा बंद करून त्याचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकण्यास सुरवात केली. यामुळे तो अस्वस्थ असल्याचे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यास कोणी दुजोरा दिला नाही. तसेच 1 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यावरही मेसचे अनुदान जमा झाल्याचे त्यांच्या मित्रांनी पोलिसांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + four =