पिंपरी  :  पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराने वेढा घातल्याने राज्यात दुःखद परिस्थिती असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सण साध्य पध्दतीने साजरा करत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिसाद दिला आहे. शहराच्या विविध भागातील मस्जिदींमध्ये आज सकाळी पवित्र वातावरणात नमाज पठण केल्यानंतर नागरिकांनी अल्लाकडे पुरग्रस्तांच्या सुरक्षीततेसाठी प्रार्थना केली.

निगडी, राहूलनगर, आकुर्डी, ओटास्किम, कस्तुरी मार्केट, दळवीनगर, चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहननगर, चिखली, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव, वाकड, काळा खडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, कासारवाडी, दापोडी आदी भागातील मस्जिदींमध्ये, मदरसांमध्ये मौलविंनी मुस्लिम बांधवांना नमाजपठण केले.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांसाठी अखंड महाराष्ट्रातून मदतीसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. पुरातील नागरिकांना सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी शासकीय कर्मचारी प्राण पणाला लावत आहेत. त्यांना शासनाकडूनही मदत केली जात आहे. परंतु, मानवतेच्या दृष्टीकोणातून समाजातील प्रत्येक घटकातून मदतीसाठी हात पुढे येताना दिसत आहेत.

तशाच प्रकारे मुस्लिम बांधवांनी आज पवित्र वातावरणार ईद सणानिमित्त नमाज पठण केल्यानंतर मस्जिदीबाहेर पुरग्रस्त नागरिकांसाठी मदत देण्याचा निर्णय घेतला. आर्थिक स्वरुपात अथवा वस्तु स्वरुपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. अनेकांनी आर्थिक स्वरुपात मदत करण्यासाठी प्रतिसाद दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + eleven =