लोकशाही वाचविण्यासाठी खटाटोप; पिंपरीत पत्रकार परिषदेत दिली माहिती

राज ठाकरे करणार मोर्चाचे नेतृत्व 

पिंपरी – निवडणुकीत ईव्हीएम मशिनचा गैरवापर होत असून लोकशाही दडपण्याचा सत्ताधारी भाजपच्या काही लोकांचा प्रयत्न आहे. राज्यातील पुरस्थितीमुळे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ईव्हीएम विरोधातील नियोजित मोर्चा पुढे ढकलला आहे. त्यामुळे काही दिवसांतच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला. ईव्हीएम विरोधात उभारण्यात येत असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी नांदगावकर पिंपरीत आले होते. त्यांनी शहर मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वांना याची माहिती दिली. यावेळी माजी गृहराज्य मंत्री अविनाश अभ्यंकर, जनहित कक्षाचे अध्यक्ष किशोर शिंदे, नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, अनिल शिदोरे, महिला उपाध्यक्षा रिटा गुप्ता, शहराध्यक्ष सचिन चिखले, राजु साळवे, बाळा दानवले, आंकुश तापकिर, अश्विनी बांगर, हेमत डांगे, शहरातील सर्व मनसैनिक उपस्थित होते.

२१ तारखेला मोर्चाचे नियोजन…

नांदगावकर म्हणाले की, लोकशाही वाचविण्याचा हा खटाटोप चालला आहे. संध्या लोकशाही ज्या पध्दतीने दडवली जाते. त्याला विरोध करण आवश्यक आहे. आत्तापर्यत ज्याठिकाणी इव्हीएम शिवाय निवडणुका झाल्या. त्याठिकाणी सत्ताधारी पक्ष पराभूत झाला आहे. त्यामुळे या शंकेला वाव आहे. २१ तारखेला इव्हीएम विरोधात मोर्चाचे नियोजन केले होते. परंतु, सध्या पुराची परिस्थिती पाहता राज साहेबांनी मोर्चा पुढे ढकलला आहे. निवडणुका पण पुढे ढकलण्याचे अवाहन केले आहे, असेही नांदगावकर यांनी सांगितले.

मतमोजणीत आढळला फरक…

अनिल शिदोरे म्हणाले की, निवडणुक आयोगाकडे असलेली २० लाख मतदान यंत्राचा हिशोब आयोगाकडे नाही. ३७१ मतदान केंद्रामध्ये ५६ लाख मतांचा मतमोजणीत फरक आढळला आहे. ही सगळी यंत्रे कुटे होती, याबाबत शंका. सुप्रीम कोर्टाला निवडणुका कशा घ्यायच्या हे ठरविण्याचे अधिकार नाही. अनेक देशांमध्ये मतदान घेण्याचा केंद्रातील यंत्र समोर ठेऊन हे हॅक करण्यासबंधी सुचना केली, तर सर्व देशातील सुशिक्षीत तरुणांनी हे मशिन हॅक करुन दाखवले. इव्हीएम हॅक करुन काम करता येते. हे सिद्ध करण्याचे चॅलेंज आम्ही घ्यायला तयार आहोत, असा इशारा शिदोरे यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.

देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन…

अविनाश अभ्यंकर म्हणाले, सध्या देशात कोणाचीही लाट असली तरी ईव्हीएम विरोधात आवाज उठवणारे एकमेव नेते राज ठाकरे आहेत. राजसाहेब जो आदेश देतील ते आपले घरचे कार्य समजून करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. अधिकाधिक लोकांपर्यंत हे कार्य पोहोचले पाहिजे. हे देशव्यापी आंदोलन आहे. त्यामुळे त्यांच्यामागे उभे राहायचे आहे. हे आंदोलन लोकशाही जगावन्यासाठीचे आंदोलन आहे. कोणत्याही संकटाच्या मागे एक संधी दडलेली असते. या संधीचे सोने केल्याशिवाय साहेब थांबणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × 3 =