चौफेर न्यूज उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या (बीआरडी) रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे तब्बल ७० बालकांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता हा प्रश्न केवळ बीआरडी रुग्णालयापुरताच मर्यादित नसल्याचे दिसते. येथील फर्रुखाबाद येथेही ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने गेल्या महिन्याभरात ४९ मुले दगावल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश प्रशासन पुन्हा एकदा हादरून गेले आहे.

फर्रुखाबादच्या डॉ. राम मनोहर लोहिया रूग्णालयात ही घटना घडली आहे. ऑक्सिजन आणि औषधांच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लोहिया रुग्णालयात २१ जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान या घटना घडल्या असून दर १४ तासाला एका नवजात बालकाचा मृत्यू असे हे प्रमाण असल्याचे सांगण्यात येत आहे.  याप्रकरणी सीएमओ, सीएमएस आणि लोहिया हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद मिश्रा यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. फर्रुखाबाद जिल्हा प्रशासनाने याबाबतचा अहवाल सादर केल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतरच रूग्णालयाचे सीएमओ, सीएमएस आणि लोहिया हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 + eighteen =