चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ’क’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मिळकती, उद्याने, क्रीडांगणे, बॅडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट यांना महापौरांनी भेटी दिल्या. तसेच, महापालिकेची उद्याने, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल, क्रीडांगणे, जलतरण तलाव, भाजी मंडई इत्याची देखभाल दुरूस्ती वेळेत करण्यात यावी, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी ’क’ प्रभाग अध्यक्षा नम्रता लोंढे, नगरसदस्य समीर मासुळकर, अश्‍विनी जाधव, राजेंद्र लांडगे, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, देशमुख, क्रीडा प्रशासन अधिकारी प्रभावती गाडेकर, आरोग्य विभागाचे कांबळे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके उपस्थित होते.

महापालिकेच्या ’क’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या मासुळकर कॉलनी येथील क्रीडांगण, इंदिरा गांधी उद्यान, हेडगेवार मैदान, भाजी मंडई, अण्णासाहेब मगर स्टेडियम व तेथील जलतरण तलाव, नाना नानी पार्क, इंद्रायणी नगर येथील क्रीडा संकुल, से.क्र.7 व 10  येथील क्रीडा संकुल, बँडमिंटन हॉल, टेनिस कोर्ट, से.क्र.16 प्राधिकरण मधील सावता माळी उद्यान व भाजी मंडई, गवळीमाथा येथील कचरा मोजणेचा मनपाचा वजनकाटा, जाधववाडी मधील मोकळ्या जागा, भाजी मंडई या ठिकाणी महापौर जाधव यांनी भेट दिली.

त्यावेळी इमारती/ उद्यानांच्या वॉल कंपाऊंडची दुरूस्ती करणे, उद्यानात मुलांसाठी नविन खेळणी बसविणे, व्यायामशाळेत व्यायाम साहित्य उपलब्ध करुन देणे. दररोज साफसफाई करणे, राडारोडा उचलणे, उद्यानातील कारंजे व्यवस्थित चालू ठेवणे. मिळकतींची नादुरूस्ती झाल्याने मिळकतींसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवणे, क्रीडांगणे विकसित करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 7 =