चौफेर न्यूज – दिघी ः दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 1 लाख 17 हजार रुपयांचा इलेक्ट्रॉनिक्स माल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. 9) सकाळी दहाच्या सुमारास चर्‍होली येथे उघडकीस आली. याप्रकरणी, प्रितेश पोपट शिवले (वय 29, रा. आझादनगर, चर्‍होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रितेश यांचे चर्‍होली येथे आझादनगरमध्ये सुखकर्ता इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे. मंगळवारी (दि. 8) रात्री दहा वाजता प्रितेश यांनी दुकान बंद केले. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून टीव्ही, मोबाईल फोन, हेडफोन असा एकूण 1 लाख 17 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास प्रितेश यांनी दुकान उघडल्यानंतर हा प्रकार समोर आला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − five =