चौफेर न्यूज – ‘एचए’ कंपनीच्या पुनरुज्जीवनाबाबत आणि कामगारांच्या रखडलेल्या वेतनाबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. त्याबाबत ‘एचए’ मजदूर संघाचे उपाध्यक्ष अरुण बोराडे यांनी नवी दिल्लीत रसायनमंत्री सदानंद गौडा यांची भेट घेतली. कंपनीने पाठविलेल्या प्रस्तावाबाबत सकारात्मक विचार करण्याची मागणी केली. या बरोबरच संयुक्‍तसचिव (जेएस फार्मा) रजनीश टिंगल यांच्याशी स्वतंत्रपणे भेटी घेऊन चर्चा केली. यावेळी ‘एचए’ कंपनीसाठी पाच कोटी रुपये देऊ, असे आश्‍वासन टिंगल यांनी दिले.

यावेळी  रसायन राज्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याशीही चर्चा केली. प्रस्तावास लवकरच कॅबिनेटची मान्यता मिळवून कामगारांना दिलासा मिळेल, असे आश्‍वासन दिले.  पाच कोटींची आठवड्यात तजवीज होईल, असे टिंगल यांनी सांगितले. या बरोबरच माजी कृषी मंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली. यावेळी संबंधित मंत्री व अधिकार्‍यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी आश्‍वासन दिले. नवी दिल्लीत ‘एचए’च्या प्रपोजलचा पाठपुरावा करण्यासाठी महत्त्वाच्या गाठीभेटी घेऊन, चर्चा करण्यात आली.  प्रस्तावास लवकरच कॅबिनेटची मान्यता मिळवून कामगारांना दिलासा मिळेल, असे संबंधितांनी आश्‍वासन केले. तर पाच कोटींची याच आठवड्यात तजवीज होईल, असे टिंगल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + 8 =