चौफेर न्यूज ः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनेखालील एच.ए. प्राथमिक शाळेत कांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त बालक दिन साजरा करण्यात आला. तत्पूर्वी, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका कल्पना आगवणे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. प्रसंगी, इयत्ता 3 री च्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित नाट्याचे सादरीकरण करण्यात आले.  तसेच, शिक्षकांनी सावित्रींच्या लेकीचे गीत सादर केले. राजश्री भालेराव यांनी बालकदिनाचे महत्व विषद केले. मुख्याध्यापिका आगवणे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना बालकदिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समिक्षा इसवे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षीका सुरेखा जाधव, शिक्षक प्रतिनिधी समता पॉल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 + twenty =