पिंपरी : एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा दावा करणारे पुणे पोलीस दलातील पोलीस दाम्पत्य तारकेश्वरी आणि दिनेश राठोड या दोघांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आल्याची घोषणा आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केली. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नियुक्तीस असलेले दिनेश टी. राठोड (वय 30) आणि त्यांची पत्नी तारकेश्वरी भालेराव (30) यांचे निलंबन करण्यात आले आहे.

एव्हरेस्ट शिखर सर करणारे आपण भारताचे पहिलेच दाम्पत्य असल्याचा दावा त्यांनी केला होता; मात्र त्यांनी शिखर सर केले नसल्याचे समोर आल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग असोसिएशनने राठोड दांम्पत्याच्या दावा खोटा असून, त्यांची सखोल चौकशी करावी, असा अर्ज आयुक्तांकडे केला होता.

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट मोहिमेसाठी सुटी मिळावी, असा अर्ज पोलीस आयुक्तांकडे केला होता. एक एप्रिलपासून तारकेश्वरी आणि दिनेश राठोड हे सुटीवर गेले होते. त्यानंतर त्यांनी 23 मे रोजी एव्हरेस्ट सर केल्याचे सात जून रोजी जाहीर केले. राठोड दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यांचे फोटोही सोशल मिडीयावरून व्हायरल झाले.

त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा माउंटेनिअरिंग असोसिएशने शंका उपस्थित करुन हा दावा खोटा असल्याचे सांगितले होते. तसेच याबाबत त्यांची सखोल चौकशी करावी, असा अर्ज रश्मी शुक्ला यांच्याकडे केला होता. त्यानंतर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सहायक पोलीस आयुक्त गणपत माडगूळकर यांच्या नियुक्ती करुन एक समिती स्थापन केली व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच त्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल, असे सांगितले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × four =