चौफेर न्यूज : कर्जबाजारी झाल्याने चिंचवडच्या मोहननगर येथील एक कुटुंब सुसाइड नोट लिहून बेपत्ता झाले आहे. 5 डिसेंबरपासून पती, पत्नी आणि दोन्ही मुलं बेपत्ता आहेत. घर सोडून जाण्याआधी सुसाइड नोट लिहून ठेवण्यात आली असून आत्महत्या करतो असे नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. बेपत्ता झालेल्या दांपत्याचं नाव संतोष शिंदे, सविता शिंदे असून मुकुंद शिंदे आणि मैथली शिंदे अशी मुलांची नावे आहेत. संतोष शिंदे यांच्यावर दोन ते अडीच कोटींचं कर्ज होतं. त्यांचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय आहे.
चालकाने चौघांना चिंचवड रेल्वे स्टेशनवर सोडले होते. तेव्हापासून त्यांना संपर्क साधता आलेला नाही. फोन करुनही संतोष फोन का उचलत नाही हे पाहण्यासाठी त्यांचा भाऊ घऱी आला असता त्याला मोबाइल, सुसाईड नोट आणि कपाटाच्या चाव्या दिसल्या. तेव्हा हा प्रकार समोर आला. संतोष गेल्या काही महिन्यांपासून कर्जाचे हफ्ते फेडू शकले नव्हते. बँकांनी मात्र ससेमिरा सुरू ठेवला होता. कर्ज फेडलं नसल्याने बँक मालमत्ता जप्त करणार हे लक्षात आल्याने ते सुसाइड नोट लिहून बेपत्ता झाल्याची माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.
‘कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार असल्याने अन्य कोणाला दोषी धरू नये. मी स्वतःच घर सोडून निघून चाललो आहे. आम्ही चौघेही आत्महत्या करणार आहोत. हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे’, असं सुसाइड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. 5 डिसेंबरला चिट्ठी लिहून चौघे बेपत्ता झाले. संतोष यांच्या भावाने 6 डिसेंबरला पोलिसांना याची माहिती दिली. संतोष शिंदे यांना दोन भाऊ आहेत. त्यापैकी एक त्यांच्यासोबत ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय तर दुसरा नोकरी करतो. मुलगा मुकुंद शिंदे हा मेकॅनिकल इंजिनियंरिंगचं शिक्षण घेत होता. चौघेही घर सोडून जाण्याआधी मोबाईल घऱीच ठेवून गेले असल्या कारणाने पोलिसांना शोध घेणं अवघड जात आहे. कुटुंबाचा शोध घेण्याचा पोलीस सर्वोपतरी प्रयत्न करत आहे.
——-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four × 1 =