भोसरी ः अर्धांगवायूच्या झटक्यामुळे नैराश्यात गेलेल्या कलाकाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना भोसरीतील आदर्शनगरमध्ये गुरूवारी (दि. 18) सकाळी अकराच्या सुमारास घडली. गुलाब तात्याराव ओव्हाळ (वय 60, रा. दिघी रस्ता, आदर्शनगर, भोसरी) असे त्या कलाकाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी घरी कोणीही नसताना त्यांनी घराच्या टेरेसवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना शेजारच्यांनी पाहिल्यानंतर याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले. ओव्हाळ हे एकत्री उत्तम कलाकार व लेखक होते. त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 1 =