चौफेर न्यूज – कानपूरच्या मार्बल मार्केटमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ची ५०० रुपयांची नोट बाहेर आल्याची घटना घडली आहे. अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून सचिन नामक व्यक्तीने १० हजार रुपयांची कॅश काढली. त्यात एक नोट बनावट होती. ‘रिझर्व्ह बँक ऑ इंडिया’च्या ऐवजी त्या नोटेवर ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापले होते, शिवाय ‘फुल ऑफ फन’ असेही त्या नोटेवर छापण्यात आले होते. लहान मुलांच्या खेळण्यात ज्या नोटा असतात, त्यातली ही नोट होती.

एटीएम गार्डकडे यासंदर्भात मी तक्रार केली असून, त्यांनी सोमवारपर्यंत नोट बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय, यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करणार असल्याचेही सांगण्यात आल्याचे सचिन यांनी सांगितले. दोन जणांनी अॅक्सिस बँकेच्या याच एटीएममधून पैसे काढले. एकाने २० हजार, तर दुसऱ्याने १० हजार रुपये. दोघांनाही ५०० रुपयांची एक-एक नोट बनावट मिळाली, जिच्यावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया छापले होते. हे एटीएम आता बंद करण्यात आले असून, तपास सुरु करण्यात आला असल्याचे दक्षिण कानपूरचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 − 1 =