उद्योजिका पल्लगी उटगी यांनी केले मत व्यक्त
चौफेर न्यूज – लंगोट नको आणि डिस्पोझेबल पण नको. मग विचार करताना हे प्रॉडक्ट सुचले. मग कापडाचे डायपर संकल्पना मनात आली आणि ती यशस्वी देखील झाली. आता डायपर्स करवून घेतो आणि 90% काम ऑनलाइन करतो. सुपरबॉटमसाठी लोकप्रियता मिळाली. युज अँड थ्रो ही कल्पना आपल्याकडे फारशी रुजली नाही, असे मत ठाणे येथील उद्योजिका पल्लवी उटगी यांनी व्यक्त केले. पल्लगी उटगी यांची वेध नाशिक 2018 या कार्यक्रमात ‘उद्योग-संकल्प ते सिद्धी’मध्ये मुलाखत घेण्यात आली. पल्लवी उटगी या ‘लेवा सखी मंडळ’ नाशिकच्या संचालिका आशा पाटील यांच्या सुकन्या आहेत.  2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या वेधच्या आठव्या कार्यक्रमात युवा उद्योजकांनी आपली यशोगाथा उलगडून दाखवली आहे. ठाणे येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अतिशय रंजकतेने मुक्त संवाद साधला.
पल्लवी उटगी यांनी सांगितले की, मी बी.ई. व एम.बी.ए. केलेले आहे. मी मोठी झाल्यावर पायलट होईन हे स्वप्न नेहमी पाहायचे. मी सुरुवातीला जॉब केला. पण आपण नेमकं काय करत आहोत, तेच कळत नव्हते. मी सतत अभ्यास करत होते. नोकरीत समाधानी नव्हते. स्वतंत्रपणे काम करायचे ठरविले. पती सलिल तसेच सासर-माहेर दोन्ही कुटुंबियांची साथ मिळाली. माझ्या मुलाचा कबिरचा जन्म झाला आणि डायपर वापराबद्दल अभ्यास झाला. त्यासाठी अमेरिकेहून काही डायपर्स मागवले. बाळाला छान वाटणे जास्त महत्वाचे आहे, हे आयांना पटले आणि त्यावर एकमतही झाले. लंगोट नको आणि डिस्पोझेबल पण नको. मग विचार करताना हे प्रॉडक्ट सुचले. मग कापडाचे डायपर संकल्पना मनात आली आणि ती यशस्वी देखील झाली. आता डायपर्स करवून घेतो आणि 90% काम ऑनलाइन करतो. सुपरबॉटमसाठी लोकप्रियता मिळाली. युज अँड थ्रो ही कल्पना आपल्याकडे फारशी रुजली नाही. त्यामुळे आपण अगदी विकतच्या श्रीखंडाचा डबा परत परत वापरत असतो.
सुरुवातीला बाळ लहान म्हणून नोकरीसाठी संधी नाकारली गेली. टीम बनवत गेले. एक स्त्री जिला नोकरी करता येत नाही तिला मी सामावून घेतले. वर्क फ्रॉम होम प्रमाणे काम करू शकतील अशा आया ब्रँडसोबत जोडल्या गेल्या आहेत. किचकट ग्राहकांना टीममध्ये घेतो त्यामुळे प्रॉडक्ट सुधारत जाते. सुपर बॉटम्सने पब्लिसिटी मिळत गेली. रोज माझ्यातली आई आणि उद्योजिका अशी लढत असते. दोन-तीन महिन्यांसाठी एक स्पर्धक आला होता पण टिकू शकला नाही. भारतात दिवसाला दिड कोटी डायपर्स वापरले जातात. सुपर बॉटम्समुळे कुठेतरी पर्यावरणाचा समतोल साधला जातोय. एक डायपर 300 ते 400 वेळा धुवून वापरला जातो. रोज 300 विकले जातात. कबीर म्हणतो माझी आई ‘डायपर इंजिनिअर’ आहे. सुपरबॉटम हे माझे काम लोकांना आवडायला लागले.
जुने आणि नवे ह्यांचा मेळ घालायला खूप आवडते. नाशिकची मिसळ तर ठाण्याचा वडापाव आवडतो. नाशिक येथील पांडुरंग कोल्हटकरांना मी गुरू मानते. पुस्तके वाचायला आवडतात. पायलट व्हायचे होते, पण ठरवले आहे की अपुर्‍या स्वप्नामध्ये आता अडकून पडायला नको. स्त्री ही भावनिक दृष्ट्या जास्त कणखर असते. माया आणि कणखरता ह्यांचा संगम आहे. नाशिकचे डॉ. जयंत ढाके तसेच डॉ. नीना ढाके ह्यांचा आयोजनात सिंहाचा वाटा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 12 =