पिंपरी ः गावी दुष्काळ असल्या कारणाने आईसोबत कामाच्या शोधात पिंपरीत आलेल्या एका तरुणाचा रेल्वेच्या धडकेत दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.15) पिंपरीतील लोहमार्गावर घडली. सोमनाथ सुखदेव जाधव (वय 35, रा. महालगाव, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सोमनाथ आणि त्याची आई हे त्याच्या गावी दुष्काळ असल्या कारणाने पिंपरीत कामाच्या शोधात आले होते. यावेळी रेल्वेच्या कडेने चालत जात असताना भरधाव रेल्वेने त्याला जोरदार धडक दिली. यामध्ये सोमनाथ याचा जागीच मृत्यू झाला. पिंपरी लोहमार्ग पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × two =