पिंपरी चिंचवड ः जुनी कार विकण्याच्या बहाण्याने एकाची तब्बल 3 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाला. विजय भगवान दगडे (वय-36, रा. ताथवडे) यांनी फिर्याद दिली असून त्यावरुन महेश कुमार, डॉ. निलेश बोराडे (संपूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल साईट’वरुन जुनी चारचाकी विकायची आहे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांचा विश्‍वास संपादन केला. यावेळी आरोपींनी दगडे यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला. व्यवहार करताना त्यांनी गाडीचे एयरपोर्ट येथील पार्कींगसाठी व कार विम्यासाठी 3 लाख 16 हजार 300 रुपये उकळले. हा सारा व्यवहार 21 ऑक्टोबर 2018 रोजी झाला. मात्र अद्यापही गाडी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे दगडे यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरीत पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − 2 =