काळेवाडी, रहाटणी प्रभाग क्रमांक 27 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी 3 वाजता भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या पदयात्रेला कुणाल हॉटेल शेजारील मैदान येथून प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन उमेदवार कैलास थोपटे व अनिता तापकीर यांनी केले आहे.

नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेविका अनिता तापकीर, सविता नखाते व विशाल भालेराव यांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. या उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे. वातावरण निर्मितीसाठी व पक्षाचे चिन्ह सर्व मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस मोठा फायद्याचा ठरणार आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × one =