चौफेर न्यूज – वाराणसीमध्ये राहत असलेल्या सर्व गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे अशी धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने वाराणसीत अनेक ठिकाणी पोस्टर्समध्ये लावले असून त्याच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. वाराणसी सोडून गेला नाहीत तर याचे परिणाम भोगण्यास तयार राहा असंही पोस्टरमधून सांगण्यात आलं आहे.

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये यावरुन मोठा विरोध होत आहे. वाराणसीमध्ये तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो’ असे या पोस्टर्सवर लिहिले आहे. वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे पोस्टर्स उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने लावले आहेत. इशारा म्हणून वाराणसीमध्ये हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये गुजरात, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हिंसेचा विरोध करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने लावलेल्या पोस्टर्समध्ये म्हटलंय की, वाराणसीमध्ये राहत असलेल्या सर्व गुजराती आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवड्याच्या आत वाराणसी सोडून जावे. नाहीतर याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे.

गुजरात येथील साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्याच्या मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर बिगर गुजरातींवर हल्ले करण्यात आले. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील लोकांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बाहेरील राज्यातील लोकांना गुजरात सोडण्यास भाग पडले आहे.

पीडित कुटुंबीय गुजरातमधील ठाकोर समाजाचे आहेत. त्यामुळे हिंसेत ठाकोर समुदायाचे नाव समोर आले आहे. हिंसाचार केल्याप्रकरणी ३०० हून अधिक लोक अटक करण्यात आले आहे. एका अंदाजानुसार आतापर्यंत दुसऱ्या राज्यातील सुमारे २० हजार लोकांनी गुजरातमधून पलायन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + three =