चौफेर न्यूज – साक्री तालुक्यातील जेष्ठ वारकरींच्या मार्गदर्शनाने युवा किर्तनकारांनी कासारे येथे साक्री तालुका वारकरी बालसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे उदघाटन 1 मे रोजी सकाळी 11.30 वाजता हभप यशोदा आक्का(श्री. क्षेत्र जायखेडा), व महंत सदाशिव गिरी महाराज(श्री क्षेत्र नागाई)यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आधुनिक विज्ञान युगाला आध्यात्मिक मुल्यांची जोड देऊन बालकांच्या मनातील आत्मविकार साध्य करणे ही खरी गरज आहे. कारण जिवनाला संस्कांराची शिदोरी असल्याशिवाय सर्वागसुंदर व्यक्ती महत्व घडू शकत नाही. हेच सुसंस्कार संत विचारातुन नित्य प्रगट होत असतात. आणि याच विचारांचा सुगंध बाल मनातुन फुलवण्यासाठी व पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा हल्लीच्या तरूण पिडीवर निर्माण झाल्यामुळे आई, वडील, जेष्ठ व्यक्ती व गुरूजन यांच्या विषयी आत्मियता संपुन, तरूण पिढी अनेक व्यसनांनी जिवन जगत आहे. त्यांना आपली धर्मसंस्कृती किती श्रेष्ठ आहे. हे आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यासाठीच साक्री तालुक्यातील युवा किर्तनकारांनी सर्व शालेय सुटीच्या काळात श्री स्वामी समर्थ मंदिर, कासारे येथे 1 ते 15 मे दरम्यान पंधरा दिवसाचे मोफत राहण्या-खाण्यासह मोफत, शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात येणारा विद्यार्थाने स्वतासाठी सोबत आंथरून, ताट, ताटली, तांब्या, ग्लास, वही, पेन व एक स्वताचा पासपोर्ट फोटो सोबत आणावे.

या साक्री तालुका बालसंस्कार निवासी शिबिरात तालुक्यातील नामवंत जेष्ठ, किर्तनकार, गायनाचार्य, मृंदूंगाचार्य, तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्य करणारे प्रतिनिधीचे मार्गदर्शन मिळनार आहे.

शिबिराला कासारे, मालपुरसह परिसरातील छाईल, प्रतापुर नाडसे, उंबर, उंबर्टी, शैवडीपाडा, कोकले कावठे, साक्री, निजामपुर, छडवेल कोर्डे, सामोडे, पिंपळनेर, दहिवेल, देशशिरवाडे, चिकसे, बल्हाणे, साक्री तालुक भजनी मंडळ आदी भजनी मंडळांची सातसंगत लाभणार आहे. शिबीरासाठी ह.भ.प. कैलास गुलाबराव देसले, ह.भ.प. बबलु माऊली उंबरेकर, ह.भ.प. नरेंद्र महाराज बल्हाणेकर, ह.भ.प. निवृत्ती महाराज चिकसे, ह.भ.प. शंकर आप्पा मालपुरकर, ह.भ.प. बाजीराव आप्पा दिघावे, ह.भ.प. देवबा आण्णा उंबरे, तसेच सरपंच,उपसरपंच, सदस्य, व ग्रामंस्थ, कासारे तसेच जिल्हातील सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

शिबिराचा समारोप 15 मे रोजी सकाळी 11 वाजता जेष्ठ वारकरी गुणगौरव सोहळा व विद्यार्थांना मान्यवराच्या हस्ते शिबिराचे प्रशिस्तीपत्र देऊन व महाप्रसादाने शिबिरीची सांगता होणार आहे. तरी परिसरातील पालकांनी आपल्या पाल्यावर सुसंस्कार घडावेत म्हणुण आपल्या पाचवी ते बारावी पर्यतच्या मुलांना शिबिरात पाठवावे, असे आवाहन आयोजक युवा किर्तनकार दिनेश महाराज सामोडेकर यांनी केले आहे.

व्यायाम, गितापाठसह कीर्तनाचे प्रशिक्षण

शिबिरात सकाळी व्यायाम, आरती, गितापाट, वाद्य संगीत पाट, बौध्दीक सत्र व्याख्यान, हरिपाठ व रात्री किर्तन यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी किर्तनकार ह.भ.प. पुरषोत्तम महाराज, पिंपळनेर, ह.भ.प. विजय महाराज पिंपळनेर, ह.भ.प. पंकज महाराज एकतासकर, ह.भ.प. प्रविन महाराज हताणेकर, ह.भ.प. तेजस महाराज मोराणेकर, ह.भ.प. सुप्रिम महाराज खोडावळ, ह.भ.प. नरेंद्र महाराज बल्हाणेकर ह.भ.प. हेमंत महाराज वडनेर, ह.भ.प.निवृत्ती महाराज चिकसे, ह.भ.प.दिनेश महाराज सामोडेकर, ह.भ.प. महिला किर्तकार शिवानीताई आळंदी, ह.भ.प. बबलु माऊली सांजोरी आदी महाराजांची किर्तने होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen − eleven =