पिंपरी चिंचवड ः किराणा मालाच्या दुकानात लोखंडी तलवारीने तोडफोड केली. यामध्ये दुकानातील दोन संगणक, फ्रीज, वजन काटा आणि किराणा मालाचे नुकसान झाले. याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास पूर्णानगर चिंचवड येथे घडली. ओमकार बालाजी करसुळे (वय 19, रा. घरकुल चिखली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. किसनाराम थानाराम चौधरी (वय 23, रा. पूर्णानगर चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसनाराम यांचे पूर्णानगर येथे बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. ओमकार मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास किसनाराम यांच्या किराणा मालाच्या दुकानात आला. त्याने तलवारीच्या साह्याने दुकानातील दोन संगणक, फ्रिज, वजन काटा यांची तोडफोड केली. तसेच किराणा मालाचे नुकसान केले. दुकानातील काऊंटरवरून पाचशे रुपये किमतीचा एक मोबाईल फोन त्याने जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला. चिखली पोलिसांनी ओमकार याला अटक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

8 + twelve =